मुंबई - मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, विज्ञान कुतूहल भवनाची निर्मिती, सीबीएसई शाळा, पालिका शाळा पब्लिक स्कुल म्हणून सुरू करणे, अशा अनेक तरतुदी करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवणार पालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला.
अर्थसंकल्पावर दृष्टीक्षेप -
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२१ - २२ या आर्थिक वर्षासाठीचा २ हजार ९४५.७८ कोटींचा अर्थसंकल्प सह आयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांना सादर केला. २०२१ - २२ चा अर्थसंकल्प २०२० - २१ या आर्थिक वर्षात पेक्षा १.१९ कोटींची वाढ आहे. सन २०२० -२१ या अर्थसंकल्पीय वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २५४१.१३ कोटी एवढे आहे. तर आगामी वर्षकरिता म्हणजेच २०२१- २२ साठी महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७०१.७७ कोटी इतके अंदाजिले आहे. सॅन २०२०- २१ या वर्षाचे भांडवली कामाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३०१.३३ कोटी असून तो सुधारित करून १७९.०३ कोटी एवढा अपेक्षीला आहे.