महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विनोद तावडेंच्या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक, छात्रभारतीने दाखवले काळे झेंडे - 10 th class

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज प्रभादेवी परिसरात काळे झेंडे दाखवले. दहावीच्या परीक्षेत देण्यात येणारे वाढीव २० गुण कमी करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी घेतला होता.त्याविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

विनोद तावडेंना छात्रभारतीने दाखवले काळे झेंडे

By

Published : Jun 14, 2019, 9:36 PM IST

मुंबई - छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज प्रभादेवी परिसरात काळे झेंडे दाखवले. दहावीच्या परीक्षेत देण्यात येणारे वाढीव २० गुण कमी करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी घेतला होता. या कमी केलेल्या गुणामुळेच यावर्षी दहावीचा निकाल कमी लागल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. याला केवळ विनोद तावडेच जबाबदार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.


१० वी आणि १२वीच्या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाला विनोद तावडे रविंद्र नाट्य मंदिर येथे आले होते. त्यावेळी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. शिक्षणमंत्री होश मे आओ, विनोद तावडे गो बॅक, विनोद तावडे खुर्ची खाली करा अशा घोषणा देत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिराचा परिसर दणाणून सोडला. यावेळी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले, उपाध्यक्ष विशाल कदम उपस्थित होते.

विनोद तावडेंना छात्रभारतीने दाखवले काळे झेंडे

तुकड्या वाढवत आणि लेखी परीक्षांचे गुण धरावेत यासाठी केंद्राशी बोलणी सुरु असल्याचे विनोद तावडेंनी आम्हाला सांगितले आहे. पण तुकडी वाढीने प्रश्न मिटणार नाही. सर्व अनुदानित तुकड्या आणि कॉलेजेस आधी एसएससी बोर्डासाठी राखून ठेवावीत. आधी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन करा मगच इतरांची अ‍ॅडमिशन. विनाअनुदानित तुकडीतील ११ वी प्रवेश गरीब मुलांना महाग पडेल. तसेच अंतर्गत गुण न मिळाल्यामुळे एसएससी बोर्डांचे जे विद्यार्थी नापास झाले आहेत, त्यांना प्रमाणशीर अंतर्गत गुण देऊन पास करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी छात्र भारतीच्या शिष्टमंडाळासोबत बैठकीचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे २० गुण रद्द करत १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला होता. या निर्णयामुळे एसएससी बोर्डाची जवळपास ४ लाख मुले नापास झाली आहेत. याउलट सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डांनी तोंडी परीक्षांचे गुण विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत. त्यांचा निकालही चांगला लागला आहे. या सगळ्याचा फटका अकरावी प्रवेशावेळी एसएससी बोर्डाच्या मुलांना बसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details