मुंबई- शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महिलांवरील वाढते अत्याचार या विरोधात भाजपने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी आज दुपारी आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी सहभागी होणार आहेत. विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
...म्हणून भाजपचा आझाद मैदानात एल्गार, फडणवीसांसह चंद्रकांत पाटील मोर्चाला करणार संबोधित - आझाद मैदानात मोर्चा
राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. याविरोधात भाजप मोर्चा काढणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या मोर्चाला संबोधित करणार आहेत, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.
भाजपचा आज आझाद मैदानात एल्गार
हेही वाचा-लोकशाही धोक्यात आणू नका, 'या' मुद्द्यावर अण्णांनी सरकारचे खेचले कान
राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. याविरोधात हा मोर्चा असणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या मोर्चाला संबोधित करणार आहेत, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.