मुंबई- इयत्ता दहावीच्या निकाल शाळा स्तरावर तयार करण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढला आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी जाण्यास शिक्षक-शिक्षकेतरांना लोकल प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीने केली आहे.
दहावी-बारावीच्या निकालासाठी शिक्षकांना रेल्वे प्रवासास जाण्यास द्या; शिक्षक संघटनेची मागणी
विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी जाण्यास शिक्षक-शिक्षकेतरांना लोकल प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीने केली आहे.
शिक्षकांनी निकाल कसा लावायचा?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या असून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचे बोर्डाने ठरविले आहे. त्याबाबत शासन निर्णय व शिक्षण मंडळाचे आदेश शाळांना प्राप्त झाले असून आज दहावीचे मूल्यमापन कसे करावे, याबाबत राज्यातील शिक्षकांचे शिक्षण मंडळाने प्रशिक्षण दिले. हे मूल्यमापन करण्यासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. त्यातच अनेक शिक्षक हे कर्जत, बदलापूर, आसनगाव टिटवाळा, वसई विरार नवी मुंबईवरून येतात. तर ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शिक्षकही लोकलने प्रवास करतात. सध्या लोकल फक्त अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्यांसाठीच असल्याने शिक्षकांना तिकीट व पास मिळत नाही. त्यामुळे दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.
शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा-
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबईचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले, की मुंबईतील ७० टक्के मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा, नवी मुंबई आणि पनवेल अशा दूरच्या ठिकाणी राहतात. यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना खाजगी वाहनातून प्रवास करणे अडचणीचे होते. त्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची परवानगी देणे आवश्यक आहे.