मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक उद्या (8 ऑक्टोबर) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून बैठकीत राज्याच्या राजकीय परिस्थितीसोबत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकरी व कामगारांसाठी केंद्र सरकारने केलेल्या कायद्यातील सुधारणांबाबत बैठकीत ठराव संमत करण्यात येतील, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी आज दिली.
कोरोनामुळे कार्यसमितीची बैठक 'व्हर्चुयल' स्वरुपात होईल व राज्यातून ठिकठिकाणाहून कार्यसमिती सदस्य बैठकीत ऑनलाइन सहभागी होतील. बैठकीचा शुभारंभ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. ते दिल्ली येथून ऑनलाइन सहभागी होतील. तसेच बैठकीचा समारोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. कार्यसमिती बैठकीपूर्वी सकाळी नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी बैठक होईल, अशी माहिती आज माधव भंडारी यांनी दिली.
भाजप प्रदेश कार्यसमितीची गुरुवारी पहिली बैठक, राज्यातील विविध विषयांवर होणार चर्चा - भाजप कार्यसमितीची बैठक
कोरोनामुळे कार्यसमितीची बैठक 'व्हर्चुयल' स्वरुपात होईल व राज्यातून ठिकठिकाणाहून कार्यसमिती सदस्य बैठकीत ऑनलाइन सहभागी होतील. बैठकीचा शुभारंभ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. ते दिल्ली येथून ऑनलाइन सहभागी होतील.
हेही वाचा -कृषी कायदा राज्यात तत्काळ लागू करावा, रयत क्रांती संघटनेची मंत्रालयासमोर घोषणाबाजी
माधव भंडारी पुढे म्हणाले की, प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ठराव मांडण्यात येईल. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यात येईल. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून त्याबाबत ठराव मांडण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे व गोंधळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार राजकीय ठरावात करण्यात येईल.
तसेच शेती क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा करणारे कायदे मोदी सरकारने नुकतेच केले आहे. तसेच सर्व प्रकारच्या कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणारी कामगार कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. याविषयी ठराव मांडून मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात येईल. तसेच जनजागृतीचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष जाहीर करतील, अशी माहिती माधव भांडारी यांनी दिली. तसेच उद्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी पदी नियुक्त झालेल्या विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर व सुनिल देवधर या नेत्यांचा सत्कार करण्यात येईल, अशी माहिती देखील भंडारी यांनी दिली.
हेही वाचा -सुशांतसिंह प्रकरण : 'मुंबई पोलिसांना बदनाम करण्यामागे भाजपा आयटी सेल'