मुंबई- लोकसभेच्या रिंगणात नसलेल्या मनसेसोबत भाजपचा शाब्दिक वाद सुरू आहे. मनसेच्या प्रश्नना उत्तर देण्यासाठी भाजपने आपली यंत्रणा कामाला लावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नांदेड आणि सोलापूरच्या सभेत टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपच्या सोशल मीडिया सेलने विविध प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या क्लिप तयार करून व्हायरल केल्या आहेत.
राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपात जरासेही तथ्य नसल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकीजचा शो आहे. या शोमध्ये त्यांनी जुन्याच फिल्म दाखवल्या, अशी खिल्लीही तावडे यांनी उडवली आहे. सरकारच्या योजना फसल्या असत्या, जर आम्ही थापा मारल्या असत्या तर त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका. ग्रामपंचायत, महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपने जिंकल्या नसत्या, असेही त्यांनी सांगितले.