मुंबई - येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेनेची युती होणार का? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. पण अखेर दोन्ही पक्षाचा जागा वाटवापाचा तिढा अखेर सुटला असून, युती होणार आहे. शिवसेना १२६ जागांवर तर भाजप आणि मित्रपक्ष १६२ जागांवर लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात रात्री जागावाटपा बाबत चर्चा झाली. त्यामध्ये हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - अशोकराव आता तुमचं काय होणार?
हेही वाचा - शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ : रावल करणार विजयाची हॅटट्रिक ?
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेची युती होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, अखेर युतीचा तिढा सुटला आहे. १२६ जागांचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मान्य केल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. रविवारी अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. यामध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - आष्टी; राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यातच, मुलाच्या उमेदवारीसाठी धस कापणार का आमदार धोंडेंचे तिकीट?
शिवसेनेने १४४ - १४४ जागांचा आग्रह धरला होता. यातून मित्रपक्षांना जागा सोडाव्यात अशी मागणी केली होती. मात्र, भाजपने त्यांचा हा प्रस्ताव अमान्य करत शिवसेनेला १२६ जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजप आपल्या १६२ जागांमधून मित्रपक्षांना जागा सोडणार आहे.