महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पुण्यातून बापटांना संधी तर बारामतीत 'कुल' - sharad bansode

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी मध्यरात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील सहा मतदार संघाचा समावेश आहे. जळगाव, नांदेड, दिंडोरी, पुणे, बारामती, सोलापूर मतदार संघातील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यावेळी भाजपने चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे.

भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर,

By

Published : Mar 23, 2019, 8:42 AM IST

Updated : Mar 23, 2019, 11:54 AM IST


मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी मध्यरात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील सहा मतदार संघाचा समावेश आहे. जळगाव, नांदेड, दिंडोरी, पुणे, बारामती, सोलापूर मतदार संघातील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यावेळी भाजपने चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे.


भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पुण्यातून गिरीष बापट यांची वर्णी लागली आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार अनिल शिरोळेचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर सोलापुरातही डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरीत विद्यमान खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांना डावलून शुक्रवारी भाजप प्रवेश केलेल्या भारती पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. जळगाव मतदार संघातही ए. टी. पाटील यांचे तिकीट कापण्यात आले आहे. या ठिकाणी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांना तिकीट देण्यात आले आहे.

बारामतीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध कांचन कुल असा सामना रंगणार आहे. कुल या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रात्री दोन वाजता याची घोषणा करण्यात आली तर माढा मतदारसंघातून भाजप उमेदवार कोण हे अद्याप जाहीर झालेले नाही. माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवार घोषित केले असून त्यांचा प्रचार आज पासून सुरू होत आहे.

दुसऱ्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवार-

  • पुणे - गिरीश बापट ( अनिल शिरोळेंचा पत्ता कट)
  • दिंडोरी - डॉ. भारती पवार ( हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट)
  • जळगाव - स्मिता वाघ ( ए.टी पाटील यांचा पत्ता कट)
  • सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी ( अॅड. शरद बनसोडे यांचा पत्ता कट)
  • बारामती - कांचन कुल
  • नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर


उमेदवारांची पहिली यादी

  1. नंदुरबार - हीना गावित
  2. धुळे - सुभाष भामरे
  3. रावेर- रक्षा खडसे
  4. अकोला - संजय धोत्रे
  5. वर्धा - रामदास तडस
  6. नागपूर - नितीन गडकरी
  7. गडचिरोली-चिमुर - अशोक नेते
  8. चंद्रपूर- हंसराज अहिर
  9. जालना - रावसाहेब दानवे
  10. भिवंडी - कपिल पाटील
  11. मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी
  12. मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन
  13. अहमदनगर - सुजय विखे पाटील
  14. बीड - डॉ. प्रीतम मुंडे
  15. लातूर - सुधाकरराव शृंगारे
  16. सांगली - संजयकाका पाटील
Last Updated : Mar 23, 2019, 11:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details