महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वयाचे कारण देऊन तिकीट कापले, बंडखोरी नाही - आमदार तारासिंग - cm devendra fadanvis

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात बऱ्याच विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला आहे. यात मुलुंड विधानसभेतून भाजपचे आमदार सरदार तारासिंग यांचे तिकीट कापले आहे.

सरदार तारसिंग

By

Published : Oct 2, 2019, 4:38 PM IST

मुंबई - मुलुंड विधानसभेतून भाजपचे आमदार सरदार तारासिंग यांचे तिकीट कापल्यानंतर तारासिंग हे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, आपण अन्य कुठल्याही पक्षात जाणार नसून पक्ष मला जी जबाबदारी देईल ती स्वीकारून कार्य करत राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार तारासिंग यांनी दिली.

सरदार तारसिंग

हेही वाचा - विलासरावांचे धाकटे चिरंजीवही निवडणुकीच्या रिंगणात, भाजपकडून रमेश कराडांचा पत्ता कट

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात बऱ्याच विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला आहे. त्यातच आता तारासिंग यांनी नमती भूमीका घेत वयाचे कारण देत तिकीट कापण्यात आले असल्याने मला कोणतेही दुःख नसल्याचे तारासिंग म्हणाले.

तारासिंग म्हणाले मुख्यमंत्र्यांनी मला वयाचे कारण देत आता थांबण्यास सांगितले होते. त्यामुळे मीही याला दुजोरा देत त्यांच ऐकलं आहे. आज पक्षाने मिहिर कोटेचाला मुलुंडमधून उमेदवारी दिली असल्याने यापुढेही पक्षाचे कार्य करतच राहणार आहे. मी मुख्यमंत्री यांचे ऐकून विधानसभा लढवणार नाही व माझा मुलुंडमध्ये मोठा चाहतावर्ग आहे त्यामुळे जिथे पक्षाला व कोटेचा यांना मदत पाहिजे असेल ती मी मदत करेन. तसेच कोणतेही बंड व अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार नाही तर पक्षाचे काम करत राहणार आहे, असे आमदार सरदार तारासिंग यांनी म्हटले.

हेही वाचा - विनयभंग प्रकरणातील भाजप आमदार चरण वाघमारेंची सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details