महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai HC order To MP Nimbalkar: खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना 30 मार्च रोजी उच्च न्यायालयात हजर होण्याचे निर्देश

भाजपाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचा उजवा हात असलेल्या दिगंबर आगवणे यांच्यावरच पोलिसांकडून खोटे गुन्हे नोंदवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिगंबर आगवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत उच्च न्यायालयाने आता पुढील सुनावणी वेळी भाजप खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.

Mumbai HC order To MP Nimbalkar
खासदार रणजीत सिंग नाईक निंबाळकर

By

Published : Mar 17, 2023, 8:05 PM IST

Updated : Mar 17, 2023, 9:40 PM IST

मुंबई:याचिकाकर्ते दिगंबर आगवणे यांनी आपल्या या सुनावणीमध्ये याचिकेत नमूद केले की, भाजपचे जे खासदार अजूनही आहेत आणि जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा राईट हॅन्ड म्हणून कार्यरत होतो. मात्र त्यांनी माझ्यावरच खोटे आरोप नोंदवले आणि असंख्य एफआयआर नोंदवल्या. परंतु हा एक षड्‌यंत्राचा भाग आहे. मला विनाकारण वेगवेगळ्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे आणि आता अंमलबजावणी संचलनालय यांनी देखील त्याबाबत कारवाई करावी म्हणून खासदार आणि तिकडे तक्रार केलेली आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.


काय म्हणाले आगवणे? दिगंबर आगवणे हे देखील आपल्या याचिकेमध्ये मांडतात की, हे सगळं करण्यामागे राजकीय सूड उगवण्याचा उद्देश दिसतो. स्वराज इंडिया ऍग्रो लिमिटेड नावाचा साखर काढण्याच्या उद्देशाने जे कर्ज काढले होते आणि कर्जाचा फायदा रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना तो मिळणार होता. त्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेकडून जवळजवळ 226 कोटी रुपये कर्ज काढले होते. याचिकेत असे म्हटलेले आहे की, रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणूक लढवावी आणि त्यासाठी दिगंबर आगवणे यांना निवडणुकीचे तिकीट केले होते. परंतु ते निवडणूक हरले. जो पराभव झाला त्याचा तो राग माझ्यावर काढणे संयुक्तिक नाही.


उच्च न्यायालयात याचिका:दिगंबर आगवणे यांचं म्हणणं आहे की, रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी राजकीय सूड उगवण्यासाठी तब्बल 20 एफआयआर दिगंबर आगवणे यांच्यावर दाखल केल्या. त्या रद्द करण्यात याव्या यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. तसेच आता ईडीच्या वतीने देखील त्यांच्या अवर तक्रार नोंदविण्यात आल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर याबाबत सर्व एफआयआर रद्द करण्याबाबतची विनंती केली होती. खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि तसे आरोप केले गेले. म्हणून दिगंबर आगवणे यांनी महाराष्ट्र शासन तसेच फलटण ग्रामीण पोलीस वरिष्ठ पोलीस अधीक्षक तसेच विशेष इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोल्हापूर जिल्हा सातारा व रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि रणजीत संदीप धुमाळ या सर्वांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.


मोक्काच्या अंतर्गत गुन्हा:कोणताही असा गुन्हा केला नसताना देखील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 म्हणजेच मोक्काच्या अंतर्गत गुन्हा देखील नोंदवलेला आहे. या कारणामुळे दिगंबर आगवणे यांनी या गुन्ह्याला देखील आव्हान दिलेले आहे. कारण हा गुन्हा देखील रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी राजकीय सुडबुद्धीने दाखल केलेला आहे, असे त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे आधी काँग्रेस पक्षात होते. नंतर ते भाजपमध्ये गेले. परंतु फलटण मतदारसंघातील ते लोकप्रिय राजकारणी आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी याचिकाकर्त्याने प्रचंड प्रमाणात मते मिळवून देण्यासाठी फिल्ड वर्क केले होते आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कारकिर्दीला आकार देण्यामध्ये दिगंबर आगवणे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

हेही वाचा:CID Investigate in Threat Case : जितेंद्र आव्हाड कुटुंबियांच्या धमकी प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली 'ही' माहिती

Last Updated : Mar 17, 2023, 9:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details