मुंबई - 100 कोटी वसुली प्रकरणी अखेर राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाली. अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख फक्त एक प्यादे होते. अजून या प्रकरणातील मास्टर्स सापडायचे आहेत, असं ट्विट भाजप खासदार मनोज कोटक यांनी केले.
देशमुख आत परमबीर बाहेर -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली प्रकरणाचे आरोप केले. तेव्हापासून आरोप व चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. अनिल देशमुख यांना अटक जरी झाली असली तरी दुसरीकडे हे आरोप करणारे परमबीर सिंह अद्याप बेपत्ता आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये अनिल देशमुख यांचे जे कोण मालक असतील त्यांनासुद्धा तुरुंगाचा रस्ता बघावा लागेल. अनिल देशमुख यांच्यासोबत असलेले इतरहीजण तुरुंगात जातील, असे मनोज कोटक यांनी सांगितले.