मुंबई- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले. मात्र, अद्यापही भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यातच शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसल्याने देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आले आहे. यामुळे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून सायन कोळीवाडा येथील भाजपचे आमदार तामिल सेल्वन यांनी माटुंगा येथील साउथ इंडियन भजन समाज मंदिर येथे आज होम हवन केले.
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; भाजपा आमदार तामिलसेल्वन यांच्याकडून होम हवन
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसल्याने देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आले आहे. यामुळे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून सायन कोळीवाडा येथील भाजपचे आमदार तामिल सेल्वन यांनी माटुंगा येथील साउथ इंडियन भजन समाज मंदिर येथे आज होम हवन केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला लागला. सत्ता स्थापनेसाठी भाजप किंवा शिवसेनेकडे बहुमताचा आकडा नसल्याने गेल्या १४ दिवसात कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता आलेली नाही. भाजपकडे १०५ आमदार असले तरी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला आणि अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद मागितले आहे. यामुळे सत्तेचा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, आज विधानसभेचा कार्यकाळ संपत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नियमानुसार पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले तर पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील का? याची शाश्वती नसल्याने फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावे व फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भाजप आमदार तामील सेलव्हन यांनी साउथ इंडियन भजन समाज मंदिर माटुंगा येथे होम हवन केले.