महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एका 'बबड्याच्या' हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला - आशिष शेलार

कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ज्ञांची मते धुडकावली. यूजीसीला जुमानले नाही. मंत्रिमंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ashish shelar on UGC exams  ashish shelar criticized mahavikas aghadi govt  आशिष शेलार लेटेस्ट न्यूज  विद्यापीठ परीक्षांबाबत आशिष शेलार
आशिष शेलार

By

Published : Aug 28, 2020, 12:43 PM IST

मुंबई -पदवी परीक्षा नको म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकार व विद्यार्थी संघटना यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळालेला नाही. राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी एका 'बबड्याच्या' हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, अशी टीका सरकारवर केली.

कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ज्ञांची मते धुडकावली. यूजीसीला जुमानले नाही. मंत्रिमंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एका 'बबड्याच्या' हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो. पण, अहंकार..! ऐकतो कोण? सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला, असेही शेलार म्हणाले.

महाराष्ट्रातील 'पाडून दाखवा सरकारने' स्वतःच्या अहंकारातून, स्वतःच तोंडावर पडून दाखवले, अशी टीकाही त्यांनी केली. पण, विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका; परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊया. यश तुमच्या वाट्याला नक्की येईल. तुमचे भविष्य उज्वलच आहे, असे आशिष शेलारांनी ट्विटरवर म्हटले आहे.

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मोठा विरोध होता. यानंतर भाजपकडून परीक्षा होण्यासाठी न्यायालयात याचिका टाकण्यात आली होती. त्यावरून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि आज अखेर न्यायालयाने परीक्षा न घेता पदवी बहाल करू शकत नाही, असा निर्णय दिला. त्यामुळे ज्यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी वारंवार विरोध केला त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details