मुंबई- भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटा काढला आहे. राज ठाकरेंचा उल्लेख या व्यंगचित्रात चक्क ‘सोंगटी’ असा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांची तारीख आणि निकालाची तारीख जाहीर होताच भाजपने राज ठाकरेंवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘राज’मान्य खेळ असा मथळा या व्यंगचित्राला देण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबईत कोणाला किती जागा? आढावा...
राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेनेपासून वेगळे होत मनसे पक्ष काढला होता. तेव्हाच्या पहिल्या 2009 च्या निवडणुकीत मनसे वेगळे लढला होता. त्यावेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला होता. तर 2019 ची लोकसभा निवडणूक मनसेने लढविली नव्हती. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- असे आहे व्यंगचित्र -
या व्यंगचित्रात राज ठाकरे खेळाच्या मधोमध उभे आहेत, असे दाखवण्यात आले आहे. 2004 च्या चौकटीत शिवसेना, 2009 च्या चौकटीत मनसे दाखवण्यात आली आहे. तर 2019 लोकसभा निवडणुकीच्या 2 चौकटी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांच्या चौकटीत उभे राहिले आहेत, असे दाखवण्यात आले आहे. त्यापुढे 2019 ची विधानसभा निवडणुकीची चौकट आहे, त्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार? असा प्रश्न विचारुन भाजपाने राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा - 'या' निवडणुकीमुळे गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला मिळाली होती कलाटणी!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजेच आघाडीसोबत राज ठाकरे जातील, असा अंदाज लावला जात होता. मात्र, मनसेला सोबत घ्यायचे नाही, ही भूमिका काँग्रेसने घेतली. त्यामुळे मनसेला सोबत घेता आले नाही. हे शरद पवार यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र 'भाजपा महाराष्ट्र' या ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे.
- 2009 ला मनसेची परिस्थिती -