मुंबई - भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. 'कोरोना वैश्विक महामारीशी संपूर्ण जग लढत आहे. अशामध्ये सर्व देश एकमेकांची मदत करीत आहेत. जेव्हा भारताला आवश्यकता पडली तेव्हा ऑक्सिजन असो, व्हेंटिलेटर असो, रेमडेसिवीर इंजेक्शन असो; इतकेच काय तर लससुध्दा इतर देशांनी भारताला मदत म्हणून दिली. लसीसाठी कच्चा माल हा परदेशातून आयात करावा लागतो. अशामध्ये भारताला कोरोनाशी लढत असताना काँग्रेस नामक व्हायरसशीही लढावं लागत आहे', असे संजय पांडे यांनी म्हटले आहे.
दिल्लीतही झळकले पोस्टर्स
मुंबई काँग्रेसने मुंबईभर लसीकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर्स लावले आहेत. असे पोस्टर मुंबईच्या आधी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडून लावण्यात आले होते. त्यावरून खूप राजकारण पेटले. पोस्टर लावणाऱ्या लोकांवर दिल्ली पोलिसांनी कारवाईही केली. आता तसेच पोस्टर मुंबई काँग्रेसने मुंबईभर लावले आहेत. त्यामुळे विरोधक काँग्रेसवर टीका करत आहेत.
'पोस्टर्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा'