मुंबई- भाजप नेते किरीट सोमैया हे मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा बाहेर काढणार होते. त्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते म्हणून सोमैया यांना घरातून बाहेर पडू दिले जात नाही. गृहमंत्र्यांनी सोमैया यांच्या घरी पोलीस पाठवले आहे आघाडी सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण..?
गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार किरीट सोमैया यांनी विकास आघाडीच्या मंत्र्यांची घोटाळ्याची यादी बाहेर काढायला सुरुवात केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सोमैया यांनी केले होते. याबाबत काही बैठकांसाठी सोमैया सोमवारी (दि. 20 सप्टेंबर) कोल्हापूरला जाणार होते. मात्र, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव केला असून तशी नोटीसही सोमैया यांना पाठवली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सोमैया यांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे. त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.