महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kirit Somaiya in Mantralaya : मंत्रालयात बसून किरीट सोमैयांनी केली फाईलची पाहणी - किरीट सोमैया लेटेस्ट बातमी

भाजप नेते किरीट सोमैया ( Bjp Leader Kirit Somaiya ) यांनी मंत्रालयात थेट नगर विकास विभागात बसून फाईल तपासल्याने एकच खळबळ माजली आहे. ( Bjp Leader Kirit Somaiya in Mantralaya ) सोमैया यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून फाईल तशा तपासण्या आणि अधिकाऱ्यांनी कशा दिल्या? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

Kirit Somaiya
किरीट सोमैया

By

Published : Jan 24, 2022, 9:27 PM IST

मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया ( Bjp Leader Kirit Somaiya ) यांनी मंत्रालयात थेट नगर विकास विभागात बसून फाईल तपासल्याने एकच खळबळ माजली आहे. ( Bjp Leader Kirit Somaiya in Mantralaya ) सोमैया यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून फाईल तशा तपासण्या आणि अधिकाऱ्यांनी कशा दिल्या? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांना अडचणीत आणणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमैयांनी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.

किरीट सोमय्या बसले अधिकाऱ्याच्या खुर्चीत -

किरीट सोमैयांनी आज मंत्रालयातील नगर विकास विभागात जाऊन थेट अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसत आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग बांधकाम कंपनीद्वारे करण्यात आलेल्या आणि अनधिकृत बांधकामाचा ठपका असलेल्या बांधकामावरील दंड आणि व्याज माफ करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला याची चाचपणी केली. मात्र, किरीट सोमैया कोणत्या अधिकारात मंत्रालयात येऊन अधिकाऱ्यांकडे फाइल तपासणीसाठी मागतात आणि अधिकारी त्यांना ती देतात हा नवा सवाल आता निर्माण झाला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या डोळ्यादेखत सरकारी यंत्रणेवर दबाव आणून किरीट सोमैया फाईल तपासत असल्याचे समोर आले. त्यामुळे याबाबत आता नगरविकास विभाग काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा -Genome Sequencing Analysis : मुंबईतील एकूण चाचण्यांपैकी ८९% ओमायक्रॉनबाधित

सरनाईक यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार -

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील दंडाची रक्कम राज्य सरकारने माफ केल्याच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती किरीट सोमैया यांनी यानंतर दिली. वित्त खाते आणि नगरविकास खाते यांनी दंड माफ करायला विरोध दर्शवला असतानाही दंड कसा काय माफ केला गेला? याची चौकशी झालीच पाहिजे, असेही सोमैय्या म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details