मुंबई -शिवसेना नेते प्रताप सरनाईक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राईट हँड असे संबोधत सरनाईक हे फरार असल्याचा आरोप, भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ई़डी आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या शोधासाठी ईडी आणि सीबीआयने लोणावळ्यामध्ये छापा टाकला आहे. या सगळ्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आता ईडी आणि सीबीआय प्रताप सरनाईकांचा शोध घेत आहे. प्रताप सरनाईक बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे. ईडीने आणि सीबीआयने लोणावळा येथील एका रिसॉर्टवर छापा टाकला आहे. काही वेळापूर्वीच दोन्ही तपास यंत्रणांचे अधिकारी या रिसॉर्टवर पोहोचले. यावरुन भाजप नेते किरीट सोमैया यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप नेते किरिट सोमैया यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. ईडीने सरनाईकांना ताब्यात घेण्यासाठी शोध सुरू केला आहे. याआधी गेल्या वर्षी ईडीने प्रताप सरनाईकांच्या मुलाला ताब्यात घेतले होते.