मुंबई : राज्यात आगामी निवडणुका लढवण्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवणार की सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार याबाबत अंदाज घेतला जात आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या छोटा भाऊ व मोठा भाऊ असा वाद सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच जागा वाटपांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार याबाबत चर्चा सुरू आहेत. या संदर्भात राज्याचे कामगार मंत्री आणि भाजपचे नेते सुरेश खाडे यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करू शकते. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना अडचण निर्माण होईल.
आम्ही तयार, आम्हीच जिंकणार -पुढे बोलताना सुरेश खाडे पुढे म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढू दे अथवा वेगवेगळ्या निवडणुका लढू दे.
तिसरी आघाडी कागदावरच-देशभरामध्ये तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेबाबत विरोधी पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केला आहे. केजरीवाल हे मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेत आहेत, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खाडे म्हणाले की, तिसरी आघाडी तयार करण्याबाबतचा हा पहिला प्रयत्न नाही. यापूर्वीही अनेकदा असे प्रयत्न झाले आहेत. मात्र हे काहीही होणार नाही. कोणी कितीही एकत्र येण्याचा प्रयत्न केला तरी कुणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला हरवू शकत नाहीत. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येण्याची आणि भाजपला हरवण्याची स्वप्न पाहू नये असेही खाडे म्हणाले.