महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतरत्नांनी देशासाठी ट्विट केलं, तर काय गुन्हा केला ? फडणवीस यांचा विधानसभेत सवाल - शेतकरी आंदोलन आणि सचि्नचे ट्विट

भारत रत्नांनी देशासाठी ट्विट केले तर राज्य सरकार त्यांच्या चौकशी करणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी आपल्या देशाबद्दल ट्विट करणं काही गुन्हा आहे का? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Mar 3, 2021, 7:46 AM IST

Updated : Mar 3, 2021, 8:41 AM IST

मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ट्विटवर भाष्य केले आहे. जर देशाच्या भारत रत्नांनी देशासाठी ट्विट केले तर राज्य सरकार त्यांच्या चौकशी करणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी आपल्या देशाबद्दल ट्विट करणं काही गुन्हा आहे का? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. समजा त्यांना मी देशाबद्दल ते ट्वीट करायला सांगितले असेल तर बिघडलं कुठे? देशाबद्दल स्वाभिमान ठेवायचा नाही का? असा उलट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विचारला.

भारतरत्नांची चौकशी नाही- गृहमंत्री

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेल्या संदर्भात कोणतीही चौकशी केलेली नाही. त्यांची चौकशी करणार असेही कधी म्हणालो नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिले. तसेच आम्ही या संबंधाची चौकशी करत असताना भाजपाच्या आयटी सेलची यातील भूमिका काय? याची चौकशी केली, आणि या संबंधित बारा जणांची तपासणी सुरू असल्याचा खुलासाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण-

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात काही विदेशी सेलिब्रिटींनी ट्विट केले होते. त्यावर काही भारतीय सेलिब्रेटिंनींकडून देखील ट्विट करण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी देखील ट्विट करत देशांतर्गत प्रश्नांवर बाहेरच्या व्यक्तींनी बोलू नये, अशा आशयाचे ट्विट केले. त्यानंतर सेलिब्रिटींनी केलेले हे ट्विट कोणाच्या सांगण्यावरून केलेत का? असा प्रश्न काँग्रेसकडून विचारण्यात आला होता आणि यासंबंधी चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.

Last Updated : Mar 3, 2021, 8:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details