मुंबई : 'अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच १२,८०६ मते 'नोटा'ला मिळाली. मागील वेळेपेक्षा कमी मतदान होऊनही, आपले पती दिवंगत आमदार रमेश लटके यांच्यापेक्षा ऋतुजा लटके यांनी जास्त मते मिळवली आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह गोठवले याचे दु:ख आहे. मशाल चिन्ह मिळाले. मशाल भडकली आणि भगवा फडकला', असं ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा (BJP leader Ashish Shelar has targeted Chief Minister Uddhav Thackeray statement) साधला आहे.
मविआला ७० टक्के लोकांनी नाकारले :उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधत, आगामी मुंबई महानगरपालिकेचं गणित देखील समजावून सांगितलं आहे. ते म्हणाले, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीने बरेच काही स्पष्ट केलं आहे. मतदानाची अत्यल्प टक्केवारी आणि नोटा यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरचा मुंबईकरांचा रोष समोर आला. तसेच तिघाडीला ७० टक्के मतदारांनी नाकारले. २०१४ नुसार विचार केला तर आघाडीच्या उमेदवारांना ९० हजार मते मिळायला हवी होती, तसे घडले नाही.
जी मत नोटाला पडली ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची होती. २०१४ मध्ये पक्ष वेगळे लढले, शिवसेना आता दोन गट आहेत. पण त्यावेळी एकत्र होते.