महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pravin Darekar On Eknath Shinde : ...म्हणून भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले; प्रवीण दरेकरांनी केला खुलासा - Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांवर आनंदराव अडसूळ यांना जितका विश्वास आहे तितकाच विश्वास भाजपालाही आहे. आमच्यापेक्षा कमी आमदार असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर भाजपाने ठेवले, असे वक्तव्य भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्याच्या पक्षातील नेत्यांची चिंता करण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांची, पक्षाची काळजी करावी. शरद पवार यांचे सूर बदलले यात नवीन काय, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.

Praveen Darekar On Eknath Shinde
Praveen Darekar On Eknath Shinde

By

Published : Apr 11, 2023, 8:22 PM IST

Updated : Apr 11, 2023, 8:30 PM IST

म्हणुन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले, प्रविण दरेकर यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्यात बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करावी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. यावर प्रवीण दरेकर बोलत होते. यावेळी बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सक्षम आहेत. हे आनंदराव अडसूळ यांना सांगण्याची गरज नाही. मुख्यमंत्री सक्षम असल्याने त्यांना त्या पदावर विराजमान केले. आमच्यापेक्षा कमी आमदार असताना त्यांना मुख्यमंत्री पदावर भाजपाने ठेवले. याचाच अर्थ ते सक्षम, भक्कम आहेत. सरकार ते चालवू शकतात याची भाजपाला पुर्णपणे जाणीव आहे. एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आनंदराव अडसूळ यांना जितका विश्वास आहे तितकाच विश्वास आमचा आहे असे दरेकर यांनी म्हटले आहे.

आपल्या पक्षाची काळजी घ्या :एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत बोलताना, एकनाथ शिंदे यांच्या गोष्टी करता. तुम्हाला तीन पक्षांनी मुख्यमंत्री केले होते. तुम्ही राजीनामा देताना इतर पक्षांना विश्वासात घेतले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तुमचा राजीनामा मित्र पक्षांना माहीत नाही. तुमच्यातील एकवाक्यता अभेद्यता जपा. दुसऱ्याच्या पक्षातील नेत्यांची चिंता करण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांची, पक्षाची काळजी घेतली तर बरे होईल. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आपण टिकावू शकत नाही ,असे शिवसैनिकांना ठाम मत आहे. तुमच्या आमदारांपैकी ४० आमदारांचे हे मत झाले. दोन वर्षे सांगून सुद्धा तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतले. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भूमिका घ्यावी लागली. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे म्हणून त्यांनी भूमिका घेतलेली नाही असे दरेकर यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांच्या विरोधात माही नाही :उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चिंता करू नये. त्यांनी त्यांचे बघावे. त्यांना स्वतःचा पक्ष, चिन्ह वाचवता आलेला नाही. पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यामुळे राजीनामा देण्याची गरज नाही. आम्ही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. बाळासाहेब हे हिंदुत्ववादी वादी होते. त्यांच्या योगदाना विरोधात आम्ही नाही.

पवारांचे सुरु बदललेलेच असतात :राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने विचार करण्याची गरज. त्यांनी आपकडून शिकावे. मागून येवून आपण दोन राज्यात सत्ता आणली. लोकांच्या कामावर लक्ष द्यावे. भाजपाला शिव्या देवून राष्ट्रीय दर्जा मिळणार नाही. शरद पवार यांनी सुरू बदलले यात नवीन काय आहे. ते अनेकदा सुरू बदलत असतात, असा टोला दरेकर यांनी लगावला.


हेही वाचा - Vajramuth Sabha : महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहणार का? काँग्रेसला वज्रमुठीत किती महत्त्व?

Last Updated : Apr 11, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details