महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या 'या' दिग्गजांना पहिल्या यादीत मिळाले नाही स्थान! - चंद्रशेखर बावनकुळे

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून मंगळवारी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाच समावेश नाही. विशेष म्हणजे खडसे यांनी मंगळवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला. या शिवाय संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांच्याही नावाचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.

भाजपच्या "या"  दिग्गजांना पहिल्या उमेदवारी यादीत मिळाले नाही स्थान!

By

Published : Oct 1, 2019, 1:55 PM IST

मुंबई -भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी १२५ जणांची पहिली यादी जाहीर केली. त्यात पक्षाच्या काही दिग्गजांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रामुख्याने माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा समावेश आहे. खडसे यांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच बरोबर जेष्ठ मंत्री विनोद तावडे यांचेही नाव पहिल्या यादीत नाही.

हे ही वाचा -आघाडीच्या उमेदवाराचे नाव वंचितच्या यादीत; राजकीय क्षेत्रात खळबळ


नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून मंगळवारी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्य नावाचा समावेश नाही. विशेष म्हणजे खडसे यांनी मंगळवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला. या शिवाय संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांच्याही नावाचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला नाही. या व्यतिरिक्त उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, राज पुरोहित, सरदार तारासिंग पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पहिल्या यादीत स्थान मिळवता आले नाही. त्याच बरोबर बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यास गणेश नाईक यांना अपयश आले आहे. त्यांच्या ऐवजी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली आहे.

हेही वाचा -आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात, ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत

या नेत्यांचा समावेश नाही -

एकनाथ खडसे
विनोद तावडे
चंद्रशेखर बावनकुळे
प्रकाश मेहता
विष्णू सवरा
गणेश नाईक
राज पुरोहीत
सरदार तारासिंग
मधु चव्हाण
अमरिश राजे आत्राम

ABOUT THE AUTHOR

...view details