मुंबई- मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपच्या बाजूने कौल आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून निकालाची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवाची तयारी सुरू केली आहे. भाजपचे नगरसेवक अतुल शहा यांनी 23 तारखेसाठी एक हजार किलो लाडूंची ऑर्डर दिली आहे. शहा यांच्या सी पी टॅंक वार्डात या लाडूंचे वाटप होणार आहे. यासंदर्भात शहा यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी..
निकालाच्या आधीच भाजपची आनंदोत्सवाची तयारी, हजार किलोच्या लाडूंची ऑर्डर - atul shaha
केवळ लाडूच नाही तर निकालाच्या दिवशी शहा चार बाय सहा फुटांचा केकही कापणार आहेत. शहा भाजप नगरसेवक असले तरी दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांचा विजय गृहीत धरून शहा यांनी तयारी केली आहे.
निकालाच्या आधीच भाजपची आनंदोस्तवाची तयारी, हजार किलोच्या लाडूंची ऑर्डर
केवळ लाडूच नाही तर निकालाच्या दिवशी शहा चार बाय सहा फुटांचा केकही कापणार आहेत. शहा भाजप नगरसेवक असले तरी दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांचा विजय गृहीत धरून शहा यांनी तयारी केली आहे.