महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरे वसाहतीमधील रस्ते खड्डेमुक्त न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू ; भाजप नगरसेविकेचा इशारा - आरे वसाहती मुंबई

आरे वसाहतीमधील खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील सर्व रस्ते 8 दिवसात खड्डेमुक्त करावेत अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी दिला आहे.

आरे वसाहतीमधील रस्ते खड्डेमुक्त न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू ; भाजप नगरसेविकेचा इशारा
bjp Corporator demad for repairing road

By

Published : Jul 2, 2020, 1:57 PM IST

मुंबई - आरे वसाहतीमधील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील सर्व रस्ते 8 दिवसात खड्डेमुक्त करावेत अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी दिला आहे.

गोरेगाव येथील आरे परिसरातील राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाची वसाहत आहे. या वसाहतीत सुमारे 15 हजार लोकांची वस्ती आहे. या वसाहतीअंतर्गत असलेल्या युनिट 5, 7, 31, 32 यामधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना,पायी जाणाऱ्यांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे, गरोदर महिला आणि वृद्धांचेही हाल होत आहेत. तसेच, खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे.

आरेमधील रस्ते दुरुस्तीसाठी 2017 मध्ये 10 ते 12 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. हा निधी आरे प्रशासनाला मिळाला. मात्र रस्त्यांची दुरुस्ती मात्र झाली नाही. यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांत रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे रस्ते 8 दिवसात दुरुस्त करावेत, असे पत्र त्यांनी आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. रस्त्यांमुळेअपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यास त्याला सर्वस्वी आरे प्रशासन जबाबदार असेल असे सातम त्यांनी म्हटले आहे. आरे प्रशासनाने 8 दिवसात रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details