मुंबई- आंबेडकर अनुयांयामध्ये चर्चेत असलेल्या इंदूमिलस्थळी उभारण्यात येत असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात पाया उभारणीचे ७0 टक्के काम पूर्ण होत आले आहे. दादर येथील इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम एम.एम.आर.डी.ए आणि शापुरजी पालनजी कंपनी करत आहे. हे स्मारक अंदाजे २०२२ साली पूर्ण होणार आहे.
INTERVIEW: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम युद्धयपातळीवर सुरू, ३६५ फूट उंची
हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान व्यक्तिमत्वाला साजेसे उभारण्यात येत असून आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा 365 फुटांचा असणार आहे. या स्मारकात ग्रंथालय, इ-लायब्ररी तसेच विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे.
हे स्मारक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महान व्यक्तिमत्वाला साजेसे उभारण्यात येत असून आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा 365 फुटांचा असणार आहे. या स्मारकात ग्रंथालय, इ-लायब्ररी तसेच विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे प्रवेशद्वार सांची स्तूपाच्या प्रवेशव्दारासारखे बौद्ध संस्कृतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात येत असून इंदूमिलमधील गोड्या पाण्याच्या तलावास चवदार तळ्याचे रूप देण्यात येणार आहे.
पुतळ्याचे ब्रॉन्स चीनमध्ये निर्माण करण्यात येणार असून त्याचे पार्ट भारतात आणल्यानंतर जोडण्यात येतील. त्यांनंतर इंदूमिलमध्ये हा पुतळा उभारण्यात येईल. हा पुतळा 365 फूट इतका उंच असल्याने समुद्रातून येणार वारे यांचा अभ्यास करून पुतळ्याच्या पायलिंगचे काम लवकरच सुरू होणार आहे. याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे प्रणेते चंद्रकांत भंडारे यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...