मुंबई- राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लोकांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ येईल का? काय अशी भीती वाटू लागली आहे. मात्र पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेक कोरोना योद्ध्यानी पुढे येऊन गरजूं- गरिबांना मदतीचा हात दिला होता. या मदतीमुळे अनेक कुटुंबाची रोजची दोन वेळची भूक भागवली जात होती. तसेच आताही कडक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक गरीब आणि गरजू लोकांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. मात्र यावेळी कोरोना योद्धा गरीब गरजू लोकांसाठी धावून आले आहेत. भाकर फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातल्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये देखील गरीब आणि गरजू लोकांना अन्न वाटप धान्य वाटप सॅनिटरी पॅड वाटप करून मदतीचा हात दिला जातोय.
राज्यात झालेल्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये देखील भाकर फाऊंडेशनच्या माध्यमात रोज जवळजवळ 500 लोकांना अन्न वाटप केले जात होते. त्याचप्रमाणे यावेळीही मुंबईतील गोरेगाव या परिसरामध्ये राहत असलेले श्रमिक कामगार लोकांच्या वस्तीत हे कोरोना योद्धे घरोघरी जाऊन अन्न वाटप धान्य वाटप आणि सॅनिटरी पॅड वाटप करत आहेत.
भाकर फाउंडेशन मुंबईत गरजूंना करतंय राशनसह इतर वस्तूंचे वाटप.. भाकर फाऊंडेशन मुंबई हे असंघटित कामगार, एकल महिला व मुलांचे अधिकार व जगण्याचा मुलभूत प्रश्नावर लोकसहभागातून काम करत आहेत. गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर, इंदिरा नगर, लक्ष्मी नगर इतर झोपडपट्टीतील स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार , घरेलु कामगार, एकल महिला व मुलांना दर रोज ५०० कुटुंबांना मोफत जेवण वाटप सुरू आहे तसेच मास्क सॅनिटरी पॅड, साबण धान्य वाटप करण्यात येत आहे. राज्यपातळीवरील लॉगडाऊनच्या काळापासून भाकर फाऊंडेशन मुंबई टिमने इतर सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या मदतीने लॉगडाऊनचा काळात गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, मिरा रोड, कांदिवली, वरळी, चेंबुर, अंधेरी, चांदीवली पवई, खार बांद्रा, नायगाव, मुंबई ठाणे, पुणे व इतर ठिकाणी घरेलु कामगार, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम मजूर, तृतीयपंथी, एकल महिला, बिडी कामगार व एचआयव्ही पॉझिटीव्ह, कोविड पॉझिटीव्ह, कर्करोग, टीबी रूग्ण, अपंग, गरोदर महिला, कचरावेचक, बेघर, आशा वर्कर, आरोग्य सेविका, दिव्यांग, लावणी कलावंत, शुटिंगमध्ये काम करणारे कर्मचारी, सफाई कामगार, असंघटित स्थलांतरित कामगारांना मदत केली आहे.
हेही वाचा -सकारात्मक! पंढरपूरमध्ये कोरोनाबाधित महिलेची प्रसुती; बाळ आणि माता दोघेही सुखरुप