मुंबई - भारतीय जनता पक्षाविरोधात सर्वच राजकीय पक्ष प्रचार सभेतून विरोध करत आहेत, मात्र आता विरोधी पक्षाकडून रस्त्यावरही विरोध करू लागले आहेत. ईशान्य मुंबई भाजपतर्फे घाटकोपर येथे रोजगार मेळावा आयोजित केला होता. या रोजगार मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने करत परिसर दणाणून सोडला.
भाजपच्या रोजगार मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने - mumbai
भारतीय जनता पक्षाविरोधात सर्वच राजकीय पक्ष प्रचार सभेतून विरोध करत आहेत, मात्र आता विरोधी पक्षाकडून रस्त्यावरही विरोध करू लागले आहेत.
या आंदोलकांना पंतनगर पोलिसांनी मेळाव्यात घुसण्याअगोदरच ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप सरकारने २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते फोल ठरले आहे. तसेच निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन भाजप तरुणांची फसवणूक करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीतर्फे करण्यात आले.
भाजपचे नगरसेवक आणि खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या म्हणाले, आतापर्यंत भाजपकडून १२ मोठे रोजगार मेळावे भरविलेले आहे, त्यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. मात्र काही राजकीय पक्षांकडून अशा ठिकाणी खालच्या पातळीची आंदोलने करणे योग्य आहे का? हे स्वतःच्या अंतकर्णाला विचारावे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातेले म्हणाले, आज साडेचार वर्षे भाजपचे सरकार आहे. भाजपने तरुणाई 2 कोटी रोजगार द्यायचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण केले नाही आहे. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर कोणते रोजगार देत आहेत. ही खासदार किरीट सोमय्या यांची नोटंकी आहे असेही ते म्हणाले.