मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. मंत्रालयातील कर्मचारी संख्येतही कपात करण्यात आली आहे. केवळ पाच टक्के कर्मचारी आणि अधिकारी मंत्रालयात उपस्थित राहत आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंत्रालयापासून ते त्यांच्या ठिकाणाजवळ पोचवण्यासाठी 'बेस्ट'ने मदतीचा हात पुढे केला आहे. बेस्ट प्रशासनाने यासाठी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना 'बेस्ट'चा मदतीचा हात - Corona Update
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचारी संख्येतही कपात करण्यात आली आहे. केवळ पाच टक्के कर्मचारी आणि अधिकारी मंत्रालयात उपस्थित राहत आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंत्रालयापासून ते त्यांच्या ठिकाणाजवळ पोचवण्यासाठी 'बेस्ट'ने मदतीचा हात पुढे केला आहे.
हेही वाचा -कोरोना निदान तपासणीचे भारतामध्ये पहिले किट तयार; पुण्यातील कंपनीला आले यश
बेस्टच्या या बसेस बोरिवली स्टेशनपासून मंत्रालय, वांद्रे शासकीय वसाहत, पनवेल बसस्टँड, ठाणे कॅडबरी जंक्शन, आंबेडकर उद्यान चेंबूर, विक्रोळी डेपो, खुराणा चौक वरळी या ठिकाणापासून ते मंत्रालयापर्यंत बेस्टच्या बसेस सोडण्यात आल्या आहेत. या बसेसचे नियोजन करण्यासाठी मंत्रालयातील काही अधिकारी आणि बेस्टच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधला आहे. कोणत्या बसमध्ये किती जण प्रवास करत आहेत, याची माहिती संकलित केली जाणार आहे, अशी माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.