मुंबई:त्यातच बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बेस्टने आपल्या खर्चात कपात केली आहे. त्यासाठी भाडेतत्त्वावर तसेच इलेक्ट्रिक बसेस घेण्यावर बेस्टने पुढाकार घेतला आहे. बेस्टच्या डेपोमध्ये असलेल्या जागांवर वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध करून त्यामधून महसूल मिळवला जात आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारून त्यामधून बेस्ट आपल्या महसुलात वाढ करणार आहे.
या ठिकाणी वाहने चार्जिंग करा:बेस्टने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १५ इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन वरळी एनएससीआय, कुलाबा बॅकबे, मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, हिरानंदानी बस स्टॅन्ड, ताडदेव बस स्टेशन, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा पूर्व बस स्टेशन, माहीम बस स्टेशन, बांद्रा बस स्टेशन, गोरेगाव पश्चिम बस स्टेशन, सेवन बंगलो बस स्टेशन आणि वालकेश्वर बस स्टेशन या ठिकाणी उभारली जाणार आहेत. या ठिकाणी वाहन चालकांना इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग करता येणार आहेत.
५५ चार्जिंग स्टेशन उभारणार:मुंबईत पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने काही ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. त्यानंतर बेस्टने आपल्या डेपोच्या जागेवर चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. बेस्ट मार्च मध्ये १५ चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. लवकरच ५५ चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे. बेस्टच्या डेपोमध्ये प्रशस्त अशी जागा असून या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारल्यास बेस्टला चांगला महसूल मिळणार आहे.