महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CORONA : खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या रुग्णालयांचे दरही निश्चित करण्यात आलेले आहेत. कोरोना बाधित रुग्णासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाला आणखी तीन महिने मुदत वाढ देण्यात आली आहे. या खाटा राखीव करण्याचे अधिकार महापालिका क्षेत्र वगळता जिल्हाधिकारी यांना तर महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे.

beds in private hospitals
खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ

By

Published : Sep 2, 2020, 6:33 AM IST

Updated : Sep 2, 2020, 7:48 AM IST


मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या ८० टक्के खाटा कोरोनासह अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या निर्णयास आता आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरीटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. शासनाच्या निर्णयाने कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरांवर देखील नियंत्रण राहील, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

राज्य या शासनाच्या या आदेशानुसार खासगी रुग्णालयांना शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. खाटा राखीव करण्याचे अधिकार महापालिका क्षेत्र वगळता जिल्हाधिकारी यांना तर महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्यस्तरावर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करीत होते. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या अधिसुचनेत जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत, त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.

सुधारीत अधीसूचनेमधील दरसूचीत रुग्णाला वापरण्यात आलेल्या ऑक्सिजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सिजनपोटी स्वतंत्र रक्कम आकारता येणार नाही. पीपीई कीटच्या दरांबाबत देखील या अधिसूचनेमध्ये उल्लेख करण्यात आला असून सामान्य वॉर्डमध्ये पीपीई कीट वापरल्यास प्रति दिवस ६०० रुपये आकारले जातील. अतिदक्षता आणि व्हेटीलेटरची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पीपीई कीट वापरासाठी प्रति दिवस १२०० रुपये इतके आकारले जातील. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास रुग्णालयांना कारणमिमांसा द्यावी लागणार आहे.

रुग्णाला बिल देण्यापूर्वी ते नेमण्यात आलेल्या लेखा परिक्षकाकडून तपासूनच देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आहेत. रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या दर आकारणी बाबत तक्रार complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलवर नागरिकांनी पाठवावी असे आवाहन करतानाच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि राज्य आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना तक्रार निवारणीसाठी प्राधीकृत करण्यात आले आहे.

Last Updated : Sep 2, 2020, 7:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details