महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यापीठाच्या बीकॉम परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

राज्यात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असला तरी विद्यार्थ्यांचा विचार करता विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा २३ मार्चपासून सुरू होत आहे. तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ च्या परीक्षेने या सत्राची सुरुवात होणार आहे. 60 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

BCOM Exam Admit Card available online
बीकॉम परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

By

Published : Mar 16, 2020, 5:02 AM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असला तरी विद्यार्थ्यांचा विचार करता विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा २३ मार्चपासून सुरू होत आहेत . तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ च्या परीक्षेने या सत्राची सुरुवात होणार आहे .60 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.


हेही वाचा - विद्यापीठाच्या बीकॉम परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासन व उच्च शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सध्या घेण्यात येत आहे. त्या निर्धारित वेळापत्रकानुसारच सुरू राहतील. तसेच विद्यापीठाच्या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या उन्हाळी सत्रामध्ये विद्यापीठाच्या चार विद्याशाखेमधून ७५० पेक्षा जास्त परीक्षा घेत असून, या परीक्षा २३ मार्च ते 2 जूनपर्यंत चालणार आहेत. अशी माहीती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपआपल्या महाविद्यालयात जाऊन तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ ची प्रवेशपत्रे घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे विविध प्रशासकीय कारणास्तव ऑनलाइन उपलब्ध झाली नसतील त्यांनी याबाबत आपल्या महाविद्यालयाकडे चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

उन्हाळी सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच, पालकासंह विद्यार्थ्यांनी देखील याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन ,कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details