मुंबई :सीबीआयने मुंबईतील वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध दोन बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दोन स्वतंत्र एफआयआर (FIR) दाखल केले आहेत. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंपनीचे दोन संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य दोन अज्ञात लोकांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकूण 388.17 कोटी रुपयांची फसवणूक :दोन्ही बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये तक्रारदार ही बँक असून तक्रारदार बँकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणामध्ये 269 कोटी रुपयांची फसवणूक आणि दुसऱ्या प्रकरणात 118 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत स्पष्ट करण्यात आलं आहे. एकूण 388.17 कोटी रुपयांची फसवणूक वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडने केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल :सीबीआयने आज दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीवर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने दिलेल्या अधिक माहितीनुसार, वरुण इंडस्ट्रीजवर या बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. बँकांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करून वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.