मुंबई -महाराष्ट्रएटीएसकडून एका बांग्लादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली एअरपोर्टवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे या बांगलादेशी तरुणाने पासपोर्ट बनवला होता. या आधारावर तो UAE ला जात होता.
महाराष्ट्र एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे, एटीएस टीम तातडीने मुंबईवरून दिल्लीला गेली आणि एअरपोर्टवरून त्याला अटक केली. इर्शाद शहाबुद्दीन शेख (33) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.