महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात बनू शकतात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष - बाळासाहेब थोरात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष न्यूज

विधानमंडळाच्या नियमानुसार नवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर निर्वाचित सदस्यांना शपथ देणे, तसेच अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून सभागृहात सर्वाधिक अनुभव असणाऱ्या सदस्यांची निवड राज्यपाल करत असतात. त्यात तब्बल आठ वेळा सलगपणे निवडून आलेले सदस्य म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नाव अग्रस्थानी आहे.

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात बनू शकतात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

By

Published : Nov 2, 2019, 12:41 AM IST

Updated : Nov 2, 2019, 4:56 AM IST

मुंबई -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे चौदाव्या विधानसभेचे पहिले हंगामी अध्यक्ष बनू शकतात. ९ नोव्हेंबरनंतर राज्यात चौदावी विधानसभा अस्तित्वात येणार असून त्यासाठी नुकत्याच विजयी झालेल्या २८८ विधानसभा सदस्यांना थोरात हे आमदारकीची शपथ देऊ शकतात. थोरात यांच्यासह १० जणांच्या नावाची यादी सचिवालयाने राज्यपालांना नुकतीच सोपवली असून त्यात सर्वात अग्रस्थानी थोरात यांचे नाव असल्याने ते नव्याने अस्तित्वात येणाऱ्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -चिंदबरम यांना तुरुंगात मिळणार मिनरलयुक्त पाणी, दिल्ली न्यायालयाचा आदेश

विधानमंडळाच्या नियमानुसार नवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर निर्वाचित सदस्यांना शपथ देणे, तसेच अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून सभागृहात सर्वाधिक अनुभव असणाऱ्या सदस्यांची निवड राज्यपाल करत असतात. त्यात तब्बल आठ वेळा सलगपणे निवडून आलेले सदस्य म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यानंतर सातवेळा निवडून आलेले दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, बबनराव पाचपुते, आणि कालिदास कोळंबकर, के.सी.पाडवी यांची नावे आहेत. त्यासोबत सहावेळा विधानसभेवर निवडून आलेल्यांमध्ये हरीभाऊ बागडे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.

राज्यात चौदाव्या विधानसभेचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले जाहीर झाले. त्यामध्ये 288 सदस्य हे निवडून आले आहेत. सचिवालयाने त्यातील दहा सदस्यांची ज्येष्ठतेनुसार यादी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना सादर केली असून यादीत पहिले नाव हे सर्वाधिक ज्येष्ठ म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांचे आहे. थोरात हे आठ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

नवीन हंगामी अध्यक्ष राज्यपाल नियुक्त करत असतात. यावेळी थोरात यांना संधी मिळाल्यास त्यांच्या हस्ते सर्व सदस्यांना शपथ दिली जाणार आहे. त्यातच पुढील अध्यक्षांची निवड प्रक्रिया राबवणे हे काम हंगामी अध्यक्ष म्हणून थोरात यांनाच करावे लागणार आहे. राज्यात २०१४ मध्ये तेरावी विधानसभा अस्तित्वात आली. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख हे सर्वात जेष्ठ सदस्य होते. मात्र त्यांनी हंगामी अध्यक्ष होण्यासाठी नकार दिला होता. म्हणून ऐनवेळी माकपचे जीवा पांडू गावित यांना हंगामी अध्यक्ष करण्यात आले होते. यावेळी थोरात यांचे नाव पहिल्या क्रमांकार आहे.

Last Updated : Nov 2, 2019, 4:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details