मुंबई- राज्यात धरणे फुटताहेत, अनेक घटनांमध्ये लोकांचा नाहक मृत्यू होत आहेत. गटारात मुले वाहून जात आहेत. रोज काहीना काही घटना घडतात, त्यामुळे या सरकारच्या काळात राज्यात चाललंय काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित करत सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका केली.
या राज्यात चाललंय काय? MTNL इमारतीच्या आगीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया - बाळासाहेब थोरात
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वांद्रे येथील आगीला प्रशासनच जबाबदार असल्याची टीका केली.
या राज्यात चाललंय काय? MTNL इमारतीच्या आगीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वांद्रे येथील आगीला प्रशासनच जबाबदार असल्याची टीका केली.
पुढे बोलताना थोरात म्हणाले, प्रशासन गंभीर नाही, यांना सर्वसामान्य लोकांबद्दल आस्था नाही. त्यामुळे रोज काही तरी दुर्दैवी घटना घडतात आणि त्याच्या पेपरच्या पहिल्या पानावर बातम्या आलेल्या दिसतात. या सर्व घटनांना प्रशासन आणि राज्य सरकार असल्याचा आरोप थोरात यांनी केला.