महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेचा यू टर्न; कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाकडे येऊ नये, राज ठाकरेंचे आवाहन

22 ऑगस्टला राज ठाकरे यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर देशातील वातावरण तापू लागले आहे. राज ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर लोकांमध्ये प्रेम वाढले आहे. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यापासून सर्व समर्थकांचे फोन येत असल्याचे नांदगावकर म्हणाले.

राज ठाकरे

By

Published : Aug 20, 2019, 1:35 PM IST

Updated : Aug 20, 2019, 3:11 PM IST

मुंबई- ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 22 आॅग्सटला ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. या दिवशी सरकारचा निषेध करण्यासाठी मनसेकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. यावेळी मोठ्या संख्येने, नागरिक, कार्यकर्त्यांनी व इतर पक्षाच्या समर्थकांनी ईडी कार्यालयाबाहेर जमण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. मात्र, आता 22ऑगस्टला कार्यकर्त्यांना शांतता राखावी. तसेच कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाजवळ जमू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांनी ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली.

मनसेचे 22 तारखेला शांततापूर्ण 'शक्ती प्रदर्शन'

यावेळी सत्ताधारी पक्षातर्फे या गर्दीत घुसून धुडगूस घालून मनसेचे नाव बदनाम करण्याचे काम करतील. यामुळे महाराष्ट्रातील किंवा बाहेरील नागरिकांना ईडी कार्यालयाकडे यायचे असतील तर त्यांनी ही शांतपणे यावे, असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर देशातील वातावरण तापू लागले आहे. राज ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर लोकांमध्ये प्रेम वाढले आहे. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यापासून सर्व समर्थकांचे फोन येत असल्याचे नांदगावकर म्हणाले.

22 तारखेला कोणताही गोंधळ गडबड न करता ईडी कार्यालयात यायचे आहे, केवळ मनसे कार्यकर्ते नाही तर इतर ही लोक तेथे येऊ शकतात. म्हणून मुद्दाम आमच्या पक्षाला गालबोटं लावण्यासाठी किंवा जाणूनबुजून आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी कोणी ही काही ही करू शकतात. पक्षाने निर्णय घेतला तर आमचे कार्यकर्ते तो पाळतात. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यामुळे देशात एक भावना निर्माण झाली असल्याचे नांदगांवकर यांनी म्हटले

जे सरकारच्या विरोधात आहेत त्यांना अशा कारवाईला सामोरे जावे लागेलच, राज ठाकरे समोर येतील तेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट करतीलच असे नांदगावकर यांनी सांगितले. तसेच यावेळी पोलिसांनीही आम्हाला सहकार्य करावे. त्याचबरोबर इतर पक्षांनीही आम्हाला समर्थन दिले असल्याचे ते म्हणाले.

Last Updated : Aug 20, 2019, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details