मुंबई-अमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) मंगळवारी सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवार) सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाचे वकील अॅड.सतीश मानेशिंदे यांनी आज युक्तिवाद केला. या प्रकरणातील 6 जणांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या निर्णय होईल, असे दीपेश सावंत याचे वकील राजेश राठोड यांनी सांगितले.
सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत अॅड.सतीश माने शिंदे यांनी युक्तिवाद केला. रियाचा 16 पाणी कबुली जवाब न्यायालयाने वाच ला आहे. आज 3 तासापासून अधिक वेळ सुनावणी सुरू होती. सरकारी वकिलांच्यावतीने देखील आज युक्तिवाद करण्यात आला. एनसीबीला अजूनही तपास करायचा असल्याने आरोपींना जामीन देण्यास विरोध करण्यात आला.