मुंबई- माजीन्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून बी. जी. कोळसे पाटील हे जनता दलचे (सेल्युलर) उमेदवार असतील, असेमहाराष्ट्र जनता दल प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी सांगितले.
कोळसे पाटील जनता दलाकडून उतरणार लोकसभेच्या रिंगणात, वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा - जनता दल
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून बी. जी. कोळसे पाटील हे जनता दलचे (सेल्युलर) उमेदवार असतील, असे महाराष्ट्र जनता दल प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी सांगितले.
MUMBAI
जनता दल महाराष्ट्रात केवळ औरंगाबादमधूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहे. माजी न्यायमूर्ती बि.जी कोळसे पाटील हे जनता दलाचे उमेदवार आहेत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही जनता दलाला पाठींबा देणार आहे. राहुल गांधी यांना भेटून देवेगौडा यांनी पाठींबा देण्याची विनंती केली असल्याचे होगाडे यांनी सांगितले.