महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Azan Teaching Video Viral: धक्कादायक! कांदिवलीतील कपोल शाळेत अजान शिकवल्याचा व्हिडिओ व्हायरल

कांदिवलीतील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी अजान शिकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा गोंधळ घातला. शिवसेनेनंतर भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांसह शाळेत घुसून शाळा प्रशासनाविरोधात अनेक तास गोंधळ घातला. कारवाईची मागणी केली. शिक्षिकेला निलंबित केल्याचे वृत्त आहे.

Azan Teaching Video Viral
निवेदन देताना पालक

By

Published : Jun 16, 2023, 7:46 PM IST

शाळेत अजान म्हणणे शिकविणे आले अंगलट

कांदिवली (मुंबई) : यावेळी शिवसेना आणि भाजप आमदारांनी घोषणा देत शाळा परिसर दणाणून सोडला. भाजपच्या मागणीनंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी अजान वाजवणाऱ्या शिक्षकाला निलंबित केले आहे. शाळेत अजान शिकवण्याचे प्रकरण तापले असतानाच हा तर विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा कट रचल्याचा आरोप पालकांनी केला. यानंतर शाळा प्रशासनानेही चूक मान्य करत पालकांची माफी मागितली.


विद्यार्थ्यांचे कुटुंबीय संतप्त : मुंबईतील कांदिवली पश्चिम महावीरनगर येथे असलेल्या कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रार्थनेच्यावेळी मुलांना अजान ऐकवल्याचा प्रकार समोर येताच शाळेतील विद्यार्थ्यांचे कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. नातेवाइकांनी ज्या मुस्लीम शिक्षकाने अजान वाजवली होती, त्याला शाळेतून काढून विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसमोर आणण्यास सांगितले. यानंतर पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेऊन तणावावर नियंत्रण मिळविले. येथील विद्यार्थ्यांना शुक्रवारी अजान, नमाज पठण शिकवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.


शाळा व्यवस्थापकाविरुद्ध कारवाईची मागणी :भाजपचे स्थानिक आमदार योगेश सागर यांनीही अजान वाजवण्यास विरोध केला. ते म्हणाले की, हा प्रकार शाळा प्रशासनाने जाणीवपूर्वक केलेला आहे. त्यामुळेच शाळा प्रशासनाने अद्याप शिक्षकाचे नाव उघड केलेले नाही. अजान वाजवणाऱ्या शिक्षकावर शाळा व्यवस्थापकाने कडक कारवाई करावी जेणेकरून शाळेतील कोणताही शिक्षक भविष्यात असे कृत्य करू नये.

देशात आणि राज्यात धर्मांतराचे : गेमिंगच्या माध्यमातून धर्मांत्तर करण्याचे प्रकार समोर आल्यानंतर देशात खळबळ माजली होती. या प्रकरणात शहनवाज नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. युपी पोलीस या आरोपीची चौकशी करत आहेत. गेमिंग अॅपचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील शाळेत विद्यार्थ्यांना नमाज पठण, आणि अजान पठण शिकवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. शाळेतील हा प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी शाळेच्या ट्रस्टीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील कांदिवलीमधील महावीर नगर मधील कपोल विद्यानिधी (इंटरनॅशनल ) शाळेत विद्यार्थ्यांना दर शुक्रवारी नमाज पठण, अजान पठण शिकवण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details