मुंबई -अवयवदानाबाबत सामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर जे.जे. रुग्णालयातर्फे महा रॅलीचे आयोजन करण्यात आले. मरीन ड्राईव्ह येथील एअर इंडिया इमारतीपासून जे. जे. जिमखान्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली.
अवयवदानाबाबत जनजागृती रॅली; सर जे.जे.रुग्णालयाचा उपक्रम
अवयवदानाबाबत सामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर जे.जे. रुग्णालयातर्फे महा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये महाविद्यालयांतील सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते.
अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सर जे.जे. रुग्णालयातर्फे रॅलीचे आयोजन
हेही वाचा -गणेशोत्सवादरम्यान दादरच्या फुल मार्केटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य
या जनजागृती रॅलीमध्ये जे. जे. रुग्णालय व इतर अनेक महाविद्यालयांतील सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलीस व अग्निशमन दलाच्या चोख बंदोबस्तात रॅली पार पडली. यावेळी विविध वयोगटातील लोकांनीही एकत्र येत अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले.