मुंबई- महाराष्ट्र सरकारने व्यसन विरोधी धोरण स्विकारले आहे, असे असताना देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनाला दारू विक्रीचे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री नाही तर दारू पाजणारे मंत्री आहेत, अशी टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे दारू पाजणारे मंत्री, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आरोप - chandrashekhar bavankule
चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री नाही तर दारू पाजणारे मंत्री आहेत, अशी टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील
अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण राज्यात दारू बंदीवर अभियान राबवत आहे आणि पुढेही याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. अशात राज्याचे उत्पादन मंत्री हे दारू बंदी करण्याचे ढोंग आणतात परंतु काही करत नाही, असे म्हणत उत्पादन मंत्र्यांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षांनी आरोप केले आहेत.