महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिक्षा चालकांचा तमाशा; विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या प्रवाशी रांगेत तू-तू-मै-मै . . .

विक्रोळी रेल्वे स्थानक पश्चिमेस माझा रिक्षा क्रमांक अगोदर आहे, या कारणावरुन दोन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. चालकांची तू-तू-मै-मै सुरू असताना हतबल झालेले प्रवाशी त्यांचा तमाशा पाहत राहिले.

रिक्षा चालकांमध्ये वाद

By

Published : Mar 19, 2019, 11:29 AM IST

मुंबई - रिक्षा रांगेत लावण्याच्या कारणावरुन दोन चालकांनी चांगलाच तमाशा केला. ही घटना विक्रोळीतील रेल्वे स्थानकाबाहेर घडली. चालकांची तू-तू-मै-मै सुरू असताना हतबल झालेले प्रवाशी त्यांचा तमाशा पाहत राहिले. दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

रिक्षा चालकांमध्ये वाद


विक्रोळी रेल्वे स्थानक पश्चिमेस माझा रिक्षा क्रमांक अगोदर आहे, या कारणावरुन दोन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. यावेळी एका रिक्षा चालकाने रिक्षा ओळीच्या समोर आडवी रिक्षा लावली. तुझी रिक्षा कशी पुढे जाणार ते पाहतोच असे सांगत त्याने दुसऱ्याला धमकी दिली. हा प्रकार पाहणारे नागरिक त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दोन्ही चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.


विक्रोळी रेल्वे स्थानकामधून चाकरमानी सकाळी लवकर गोदरेज कंपनी, कैलास व्यपारी संकुल, आर सिटी मॉल घाटकोपर, हिरानंदानी पवई, सिपला कंपनी विक्रोळी येथे कामावर जाण्यासाठी घाई करतात. येथून हाताच्या बोटावर मोजता येतील अशा बस आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांची चांगली कमाई येथून होते, असे प्रवासी बोलतात.

ABOUT THE AUTHOR

...view details