मुंबई - भारतीय जनता पक्षाने प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी द्यायला नको होती. असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. प्रज्ञा सिंह या वादग्रस्त व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरही भाजपने त्यांच्यावर कारवाई केली नाही. याबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी द्यायला नको होती - रामदास आठवले - election
मतदान केल्यावर रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीवर नाराजी दर्शवली. प्रज्ञा सिंह यांच्यावर दहशतवादाचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देणे योग्य नव्हते. प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याबाबतही आठवले यांनी नापसंती व्यक्त केली.

मुंबईत मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचे त्यांनी स्वागत केले. लोक सरकारच्या कामावर विश्वास ठेवून मतदान करत आहेत, असे आठवले म्हणाले. मुंबईतील सहा जागांवर युती विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.