महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंगरीतील 'ती' इमारत 2017 मध्येच अतिधोकादायक म्हणून घोषित - अश्विनी जोशी - म्हाडा

म्हाडानेही लोकांना या इमारतीमध्ये वास्तव्य करू नये, असे सांगितले होते, अशी माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली आहे.

डोंगरीतील 'ती' इमारत 2017 मध्येच अतिधोकादायक म्हणून घोषित - अश्विनी जोशी

By

Published : Jul 16, 2019, 4:57 PM IST

मुंबई- डोंगरी परिसरातील कोसळलेल्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करण्यासाठी 2017 मध्येच नोटीस दिली होती. त्यानंतर स्ट्रकचरल ऑडिटमध्ये ही इमारत अतिधाकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. पोलिकेने म्हाडाला ही माहिती दिली होती. तसेच म्हाडानेही लोकांना या इमारतीमध्ये वास्तव्य करू नये, असे सांगितले होते, अशी माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली आहे.

डोंगरीतील 'ती' इमारत 2017 मध्येच अतिधोकादायक म्हणून घोषित - अश्विनी जोशी

मुंबईतल्या डोंगरी भागात झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर ही इमारत नेमकी कोणाच्या अखत्यारीत येते, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

डोंगरीतील 'ती' इमारत 2017 मध्येच अतिधोकादायक म्हणून घोषित - अश्विनी जोशी

डोंगरी परिसरात एक 4 मजली इमारत कोसळली आहे. केसरबाई ही 4 मजली निवासी इमारत कोसळली असून या घटनेत अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details