मुंबई- काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रविवारी समोर आले. यानंतर आता त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडहून मुंबईला हलवण्यात येत आहे. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती अथवा इतर मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाग्रस्त अशोक चव्हाणांवर मुंबईत होणार उपचार
चव्हाण यांना रक्तदाब आणि मधूमेहसारखे आजार असल्याने त्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी मुंबईत हलविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर चव्हाण यांच्या वाहन चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

चालक पॉझिटिव्ह आल्यानंतर चव्हाण यांनी नांदेड येथे स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते. या दरम्यान आपल्या कुटुंबापासूनही ते दूर राहिले. अशात रविवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. आता चव्हाण यांना नांदेडहून एका खासगी रुग्णवाहिकेने आणि पोलीस बंदोबस्तात मुंबईला आणण्यात येत आहे.