मुंबई - भाजप कोरोना विषाणूपेक्षा घातक आहे. त्यामुळे काळजी घेतलीच पाहिजे, या विषाणूवरती उपाय शोधण्याचे प्रयोग सुरू आहेत, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे एक सक्षम मुख्यमंत्री आहेत. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारला कोणताही धोका होणार नाही. ज्या राज्यांमध्ये आपली सत्ता नाही अशा राज्यांमध्ये 'ऑपरेशन लोटस'च्या नावाखाली गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करणे ही भाजपची नेहमीची सवय आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. भाजपच्या या धोरणाला खतपाणी घातले जाणार नाही, याची काळजी लोकशाही मानणाऱ्या सर्व पक्षांनी घेतली पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.