मुंबई- राजस्थान आणि मध्य प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागतील, असे भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी त्यांच्याशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी हे वक्तव्य केले.
'राजस्थान, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागतील' - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा दाऊदच्या साथीदाराशी संबंध असल्यास भाजपने त्याचा तपास करावा. सर्व यंत्रणा सध्या भाजपच्या ताब्यात आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा - विक्रोळीत निवडणुकीच्या कामावरील अधिकार्याचा हृदयविकाराने मृत्यू
तसेच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा दाऊदच्या साथीदाराशी संबंध असल्यास भाजपने त्याचा तपास करावा. सर्व यंत्रणा सध्या भाजपच्या ताब्यात आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री असताना दाउदचा खास हस्तक इक्बाल मिरची याच्यासोबत माजी हवाई मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यात संपत्तीवरून देवाण-घेवाण झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावरही चव्हाण यांनी भाष्य केले.