मुंबई- महाविकासघाडीच्या घटक पक्षाने राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी बहुमताची संख्या दर्शवून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. विश्वासदर्शक ठरावात आम्हीच जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
विश्वासदर्शक ठरावात महाविकासआघाडीच जिंकेल - अशोक चव्हाण - political news mumbai
महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिम्मित विधान भवनात अभिवादन करण्यासाठी चव्हाण आले होते. त्यावेळी त्यांनी ई टीव्हीशी संवाद साधला.
हेही वाचा-राजभवनाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा वेढा
महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिम्मित विधान भवनात अभिवादन करण्यासाठी चव्हाण आले होते. त्यावेळी त्यांनी ई टीव्हीशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादीने आपला विधीमंडळ नेता बदलला आहे. आम्ही राज्यपालांकडे 162 आमदारांचे संख्याबळ असल्याने आम्हाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्यावे, अशी विनंती राज्यपालांना केली आहे. अवैध मार्गाने भाजपने राज्यपालांची आणि जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.