मुंबई - राज्य सरकार जर निवासी भागातील हॉटेल, पब सुरू ठेऊन सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असाल. तर, आमचा त्याला कडाडून विरोध असेल, असे भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत दुकाने, मॉल, हॉटेल, पब 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याबाबत भूमिका मांडताना भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, मुंबईत हाँटेल, बार, पब 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे, ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण, निवासी भागात हॉटेल, पब 24 तास सुरू ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर, आमचा कडाडून विरोध राहिल.
हेही वाचा -'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट'